जळगाव प्रतिनिधी । शहरातील नवीपेठेतील महापालिकेच्या शाळेजवळ एका ४० ते ४५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगावातील नवीपेठेतील महापालिकेच्या मुक बधिर शाळेजवळ आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास एका ४० ते ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार सदरील व्यक्ती भिकारी असून थंडीमुळे मृत्यू झाला असावा. मृतदेह आढळून आल्याने शहर पोलीसांना स्थानिक नागरीकांनी माहिती दिली. शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणण्यात आला आहे.
याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रविण पाटील यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ संजय झाल्टे आणि महिला पोलीस दिपाली पोरे करीत आहे.