जळगाव: येथील एक मेव उर्दू माध्यमा ची माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय के.के.उर्दू मुलींची माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया ची प्राचार्या शमीम बानो मलीक ह्या आपल्या तीन दशकी प्रदीर्घ सेवा नंतर प्राचार्या पदा वरुन ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाल्या त्यांच्या निरोप समारंभ संस्था अध्यक्ष डॉ.अमानूल्लाह शाह यांच्या अध्यक्षतेखालील संपन्न झाला,
आपल्या अध्यक्षीय भाषणात मार्ग दर्शन करताना ते म्हणाले की शिक्षक वृन्द समाज संस्कृती निर्माता व वैचारिक क्रान्ति चे प्रेरक असून तेच राष्ट्रा ची भावी पिढी निर्माण करतात संवेदनशील व कृतिशील शिक्षक जर वयोमना ने निवृत्त झाले तरी ते आपल्या कृती ने कार्यशील च असतात व सकारात्मकते ने कार्य करीत असतात, खजिनदार डॉ.मोहम्मद ताहेर शेख,पालधी हायस्कूल चे मुख्याध्यापक मोहम्मद मुश्ताक करीमी,अकिल खान,तन्वीर इकबाल, जाकीर शाह व विद्यार्थीनी नी हि सत्कार मुर्ती शमीम मलीक यांच्या कार्याची नोंद घेऊन विचार व्यक्त केले,
आपल्या निरोपीय सत्कारा ला उत्तर देताना शमीम मलीक म्हणाल्या की मला मिळाले ली सेवे ची संधी ला व विश्वासाला चिज करण्या चे मी काटेकोर पणे प्रयत्न केले शिक्षणा चे लाभ व अनुभव मी प्रत्यक्षात अनुभवले असुन ते समाजात रुजविण्या चे प्रयत्न केले. छोटेखानी संपन्न झालेल्या या कार्यक्रमात उपाध्यक्ष अलहाज मजीद सेठ झकेरिया,सदस्य जाहिद शाह,शमीम मलीक चे कुटुंबीय,काही विद्यार्थी नी प्रतिनिधि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते, यशस्विते साठी सांस्कृतिक मंडळा ने परिश्रम घेतले,सूत्र संचालन मझहरोदीन शेख,जाकीर शाह, तबरेज शेख, यानी केले.