शिरूर जि. पुणे (प्रशांत पवार) – शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक बापु पवार अध्यक्ष सार्वजनिक उपक्रम समिती यांनी शिरूर हवेली मतदार संघामध्ये ग्रामीण व शहरी भागात असणाऱ्या झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्यांची संख्या मोठी असुन तेथील नागरीकांना सोयी सुविधांन साठी कार्यसम्राट आमदार अशोक बापु पवार नेहमी प्रयत्न शिल असतात.
यामुळे झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्यांना नागरीकांना मुंबईच्या धरर्तीवर झोपडपट्टी पुर्नरवसन अंतर्गत हक्काची आणि पक्की घरे मिळावी यासाठी यासाठी आमदार सदैव प्रयत्न शिल आहे.
याबाबत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना शहर नजिक वाढत असलेल्या झोपडपट्टी मध्ये एस.आर.ए योजना राबविणे बाबत प्रयत्न करावे, तसेच झोपडपट्टी असणाऱ्या ठिकाणी उच्चतम विकासकाकडून झोपडपट्टी विकासासाठी प्रयत्न करावे, याबाबत पत्रव्यवहार केला आहे.
राज्याचे गृहनिर्माण विकास महामंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगाने यांना देखील पत्र व्यवहार करून महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळ यांच्या माध्यमुन शिरूर शहर व वाघोलीत असणाऱ्या शासकिय जागेवर झोपडपट्टी धारकांना मोफत घरे मिळावी यासाठी मागणी केली आहे.
मुंबईच्या धर्तीवर एस.आर.ए योजना ग्रामीण भागात राबविल्यास ग्रामीण भागात गरीब नागरीकांना हक्काची घरे उपलब्ध होतील
– आमदार अशोक बापु पवार