शिरूर जि. पुणे (प्रशांत पवार) – साधना महिला नागरी महिला पतसंस्था शिरूर यांच्या दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन समिती माजी सभापती विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सौ.सुजाता (भाभी) अशोक पवार प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
साधना महिला नागरी महिला पतसंस्था शिरूर यांच्या दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन समिती माजी सभापती विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सौ.सुजाता(भाभी) अशोक पवार व तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस रविंद्र काळे,जाकिरखान पठाण मा.नगरसेवक,मुजफ्फर कुरेशी शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस , सौ. सुरेखा शितोळे नगरसेवीका, रंजन झांबरे अध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस,शितोळे करिअर अॅकाडमीचे संस्थापक संजय शितोळे, प्रदिप घावटे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
प्रास्ताविक व स्वागत सौ.साधना संजय शितोळे संस्थापक-अध्यक्षा साधना महिला नागरी सह. पतसंस्था मर्या. शिरूर यांनी केले, शिरूर-हवेलीचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार तथा अध्यक्ष सार्वजनिक उपक्रम समिती ॲड् श्री अशोक रावसाहेब पवार यांच्या पाठपुराव्यामुळे ज्ञानज्योती, क्रांतीज्योती,सावित्रीबाई फुले यांची जयंती दिवस ३ जानेवारी “शिक्षण दिन” म्हणुन याबद्दल आभार मानले. पी.एम्.पी.एल् बस सेवा पुणे ते रांजणगाव पर्यत सुरु आहे, ती बस सेवा पुणे ते शिरुर पर्यंत करण्यात यावी असे निवेदन सर्व महिलांच्या वतीने देण्यात आले.
तसेच शिरूर-हवेलीचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार तथा अध्यक्ष सार्वजनिक उपक्रम समिती श्री अशोक रावसाहेब पवार यांची हिवाळी अधिवेशनात सभापती तालिकेवर निवड झाल्याबद्दल अभिनंदन व भावी वाटचालीत मंत्री पद मिळावे यासाठी शुभेच्छा देण्यात दिल्या. संदिप पंढरीनाथ आढाव सलग दुसऱ्यांदा जागतीक विमा परिषदेच्या सदस्य पदी सलग दुसऱ्यांना दा अमेरिकेच्या जागतिक विमा परिषदेच्या सदस्य पदी सलग दुसऱ्या वेळी निवड झाली, तसेच शिरूर एल.आय.सी मध्ये प्रथम क्रमांका आला आहे. त्यामुळे सर्व महिलांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी गौरी घावटे, राजश्री घावटे,वैशाली रत्नपारखी, मनिषा आढाव,श्रृतीका झांबरे, सीमा तळेकर, सीमा बारवकर, मंगल घावटे,निलम सोनवणे, भारती बारवकर, सुनंदा गोसावी,उषा चव्हाण, रोहिणी पवार , अनिता पाचंगे, शारदा हिंगे, कविता वाघमारे,माजी. नगरसेवीका सीमा काशीकर ,बेबी शितोळे, ज्योती वाळके, शिरूर -हवेलीच्य संपादिका शोभा परदेशी, कल्याणी गुळादे,शार्लेट ओहळ, शरमिला निचित, वैशाली चव्हाण,आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. शार्लेट संजय ओहळ यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.