पाचोरा, प्रतिनिधी : तालुक्यातील पाचोरा येथील नांद्राजवळ पिकअप मालवाहू गाडीने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत मोटारसाकलस्वार तरुण जखमी झाल्याची घटना आज सकाळी नांद्रा येथील पेट्रोल पंपाजवळ घडली . जखमी तरुणाला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तालुक्यातील नांद्रा येथील पेट्रोल पंपाजवळ आज सकाळी जळगाव कडून येणाऱ्या पिकअप (क्र. एम. एच.१७ बी. वाय. ४६१८) या बोरोलो पिकप वाहनाने होन्डा कंपनीच्या दुचाकी (क्रं. एम. एच. १९ डी. एफ.७३७२) ला जोरदार धडक दिली.
पाचोरा येथील तरुण रामदास प्रकाश पाटील (वय – ४२) यांची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकी सरळ पिकप वाहनांच्या खाली आल्याने दुचाकीस्वाराला ५०० मिटर फरफडत नेल्याने रामदास पाटील यांच्या पायाला जबर मार लागल्याने फ्रक्चर झाले आहे. त्यांना पाचोरा येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.