जळगाव – निसर्गमित्र जळगाव तर्फे रविवार दि.२७ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ७ ते ९.३० या वेळात मेहरुण तलावावर सरत्या वर्षाला अलविदा करण्यासाठी पक्षीनिरीक्षण सहल संपन्न. यात विद्यार्थी व नागरिकानी आपला सहभाग नोंदवला पक्षी निरीक्षण दरम्यान मेहरुण तलावावरील स्थानिक तसेच विदेशी,देशी स्थलांतरीत पक्ष्यांचे दर्शन झाले.एकूण ४७ जातीच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आल्याची माहिती पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाङगीळ यांनी दिली.
पक्षी निरीक्षणात शिकरा, माळमुनिया, जांभळा सूर्यपक्षी, भारतीय दयाळ, वेडाराघू, सामान्य खंड्या, धीवर आणि पांढऱ्या गळ्याचा खंड्या, वारकरी, पाणकावळा, टिटवी, प्ल्ववा, वंचक अशा काही स्थानिक पक्ष्यांसोबत नदी सुरय, कमल पक्षी, स्वरल, थापट्या, जांभळी पाणकोंबडी, तुतारी, पांढरा धोबी, करडा धोबी, पांढर्या भुवईचा धोबी, श्वेतकंठी, धान वटवटया, पाणडुबी हे देशी – विदेशी स्थलांतरित मिळून ४६ जातीचे पक्षी आढळून आले. पक्षी अभ्यासक शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी दुर्बिणीच्या साह्याने पक्षी दाखवून पक्ष्यांबद्द्ल मार्गदर्शन केले. या सहलीत संकल्प सोनवणे, जय सोनार, सोमिक सारडा, सलोल सारडा, कमलकिशोर मणीयार, सागर इंगळे, गोकुळ इंगळे, नचिकेत रावेरकर, विशेष रावेरकर, विलास बर्डे, श्रेयस भोळे, पंकज भोळे, मनोज चंद्रात्रय यांनी सहभाग घेतला. उपस्थितांचे आभार राजेंद्र गाडगीळ यांनी मानले.