मेष : आपण घेतलेल्या विचारपूर्वक निर्णयामुळे फायदा होईल. आप्तस्वकियांच्या भेटी होतील. आपले अंदाज अचूक ठरतील. जुने मित्र भेटतील त्यांच्याबरोबर आनंद लुटाल. करमणुकीच्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्याल.
वृषभ : मानसिक स्वास्थ लाभेल. आपण घेतलेले निर्णय योग्य ठरतील. कौटुंबिक कलह टाळावेत. नवीन कार्यारंभाचा उत्साह निर्माण होईल. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल.
मिथुन : कुटुंबाबरोबर सहलीला जाण्याचा बेत आखाल. कुटुंबासाठी काही विशेष खरेदी केली जाईल. व्यवसायातील कामासाठी सरकारी परवाने मिळतील. सरकारी नोकरीत असणाऱ्यांना चांगले लाभ होतील.
कर्क : मोत्याच्या दागिन्यांची खरेदी कराल. आजचा दिवस गुंतवणूकीसाठी अनुकूल. आपली इच्छापुर्ती होईल. आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. नवीन व्यवसायासाठी भांडवल उभे कराल.
सिंह : नोकरीनिमित्त छोटे प्रवास करावे लागतील. नोकरीत योग अधिकार प्राप्त होतील. आर्थिक उत्कर्षाच्यादृष्टीने आजचा दिवस अनुकूल. पत्नीचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. एकमताने निर्णय घ्याल. सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल.
कन्या : आज आपण मनोरंजनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. नोकरीतील कामानिमित्त प्रवास करावे लागतील. आजचा दिवस आपली इच्छापूर्ती करणारा आहे. हाती घेतलेले काम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सहाय्यकांची मदत मोलाची ठरेल.
तूळ : कलाकारांसाठी आजचा दिवस भाग्याचा. कलेला अनपेक्षितपणे भरपूर वाव मिळेल. मनोबल उंचावणाऱ्या घटना घडतील. सामाजिक क्षेत्रातील नेतृत्वामुळे प्रतिष्ठा उंचावेल. इच्छापूर्ती होईल.
वृश्चिक : नोकरीत जबाबदारीचे काम करावे लागेल. काळजी करू नका. सहकाऱ्यांच्या मदतीने काम पूर्ण होईल. सामाजिक कार्यात मानाचे स्थान लाभेल. आप्तस्वकीयांच्या गाठीभेटी होतील. नवीन व्यवसायासाठी भांडवल गोळा करण्यात यश येईल.
धनु : नोकरीत केलेल्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. त्यामुळे मानसिक स्थैर्य लाभेल. विरोधकांवर मात कराल. महत्वाचे निर्णय घेण्याचे टाळावे. परदेशातील भावंडांशी सल्लामसलत करुन महत्वाचे निर्णय घेतले जातील. प्रवासातून कार्यसिद्धी होईल.
मकर : शैक्षणिकदृष्टीने प्रगतीकारक घटना घडतील. मित्रपरिवाराचे सहकार्य लाभेल. आपली इच्छापूर्ती होईल. भावंडांशी झालेले पूर्वीचे मतभेद गोड बोलून नाहीसे कराल. आपले अंदाज अचूक ठरतील.
कुंभ : मामेभावंडांशी भेटी घडतील. व्यवसायात त्यांचे सहकार्य लाभेल. व्यावसायिककार्यक्षेत्र वाढेल. व्यवसायातील आत्मविश्वास व कामाचा वेग वाढेल. जनसंपर्कातून लाभ होतील.
मीन : घरगुती समारंभासाठी प्रवास करावा लागेल. संततीसंबंधी चांगली बातमी समजेल. आपले अंदाज अचूक ठरतील. समस्येचे निराकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. कामात थोडा बदल केल्याने बरे वाटेल.