Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

लोढा यांच्या म्हणण्यात काहीही तथ्य नाही – रवींद्र भैया पाटील

by Divya Jalgaon Team
December 26, 2020
in जळगाव, राजकीय
0
लोढा यांच्या म्हणण्यात काहीही तथ्य नाही - रवींद्र भैया पाटील

जळगाव- प्रफुल्‍ल लोढा यांनी ज्‍येष्‍ठ नेते एकनाथराव खडसे यांच्यावर  केलेले आरोप आणि त्‍यांना ईडीची नोटीस प्राप्त झाल्‍यानंतर राष्‍ट्रवादी काँग्रेसचे जिल्‍हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी ते म्हणाले की, ईडीची नोटीस आली तरी समर्थपणे उत्तर देईन असे नाथाभाऊंनी राष्ट्रवादी प्रवेशावेळी केलेल्या भाषणातच सांगितले होते, तसेच प्रफुल्ल लोढा हे आमच्या पक्षाचे साधे सदस्यही नाहीत त्यामुळे त्यांच्या बोलण्याची दाखल घ्यावी असे  वाटत नाही.

महिन्यापुर्वी राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्‍येष्‍ठ नेते एकनाथराव खडसे यांनी प्रवेश केला. त्याप्रसंगीच नाथाभाऊंनी म्‍हटले होते की, ईडीची नोटीस येणार; पण त्‍यास सक्षमपणे उत्‍तर देणार. आता ईडीची नोटीस आली असली तरी त्यास  नाथाभाऊ सक्षमपणे उत्‍तर देतीलच. पण जिल्‍ह्‍यात राष्‍ट्रवादी संघटीत झाल्‍याचे पाहून द्वेषापोटी हा प्रकार करण्यात आला आहे.

यावेळी ते म्‍हणाले की, नाथाभाऊंनी राष्‍ट्रवादीत प्रवेश करतानाच म्‍हटले हेाते, की तुम्‍ही ईडी लावाल तर मी सीडी काढेल आज खडसेंची भेट घेतली असून ते मुंबईकडे रवाना झाले असून, ईडीच्या नोटीसला ते निश्‍चितच सक्षमपणे उत्‍तर देतील; असा विश्‍वास पाटील यांनी व्यक्‍त केला.

तसेच आपण विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मदत केल्याच्या लोढा यांच्या म्हणण्यात काहीही तथ्य नाही ते काही सभांमध्ये या पक्षांच्या नेत्यांसोबत दिसतात एवढेच त्यांच्याबाबतीत सांगता येईल गर्दीमध्ये कुणीही कुणासोबत दिसू शकतो त्यांना एवढे महत्व देण्याची गरज नाही त्यांचे संभाषण वकिलांच्या सल्ल्याने तपासणीला देऊन कायदेशीर कारवाई केली जाईल , असे देखील त्यांनी सांगितले.

Share post
Tags: ConferenceJalgaonPoliticalलोढा यांच्या म्हणण्यात काहीही तथ्य नाही - रवींद्र भैया पाटील
Previous Post

ईडीच्या चौकशीला पूर्णपणे सहकार्य करणार- एकनाथराव खडसे

Next Post

विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराबद्दल विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केले प्रश्न

Next Post
विद्यापीठाच्या ऑनलाईन परिक्षांसाठी विद्यार्थ्यांना मॉकटेस्ट देणे बंधनकारक

विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराबद्दल विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केले प्रश्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group