जळगाव – कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठ विविध विषयांचे बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊ शकले नाही त्यामुळे विद्यार्थी बॅकलॉगच्या परीक्षा देण्यापासून वंचित राहिले आहेत. परंतु अंतिम वर्षाच्या परीक्षा घेत असताना त्यांच्या सर्व सत्राच्या बॅकलॉगच्या परीक्षा विद्यापीठाने घेतलेल्या आहेत.
त्याचप्रमाणे विद्यापीठाने प्रथम, द्वितीय व तृतीय नियमित सत्राच्या परीक्षा विद्यापीठ प्रशासनाने आयोजित केले आहे. तसेच विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरताना बॅकलॉगच्या विषयांचे देखील शुल्क भरले आहेत त्यामुळे नियमित सत्राच्या परीक्षा सोबतच बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांची प्रथम, द्वितीय व तृतीय सत्राची परीक्षा देखील घेण्यात यावी.
विद्यापीठाने काढलेल्या परिपत्रकानुसार फक्त ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यासंदर्भात सांगितले आहे परंतु ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी विविध कारणांमुळे परीक्षेपासून वंचित राहू शकतात त्यामुळे विद्यापीठाने ऑफलाइन परीक्षा देण्याचा देखील पर्याय उपलब्ध करून द्यावा. अशी मागणी आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने कुलगूरू महोदयांना निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी अभाविप महानगर मंत्री आदेश पाटील, नगरमंत्री आदित्य नायर, विद्यापीठ परिसर अध्यक्ष चंद्रकांत पाटील व आकाश पाटील उपस्थित होते.