जळगाव – राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना ईडीने नोटीस बजावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात उडाली होती. मात्र त्यावर खडसे प्रतिक्रिया देत म्हणाले की, अद्याप आपल्याला नोटीस मिळाली नसल्याचे सांगितले.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने नोटीस बजावल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार ईडीने त्यांना चौकशीसाठी ३० डिसेंबर रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
तसेच यासंदर्भात प्रतिक्रिया देतांना एकनाथराव खडसे यांनी आपल्याला ही नोटीस मिळालेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. आपल्याला जेव्हा नोटीस मिळेल तेव्हाच आपण या प्रकरणी बोलू असे ते म्हणालेत.