जळगाव- सध्या शहरात अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. याच पाश्र्वभूमी शहरातील मानराज पार्कजवळ बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर रामानंदनगर पोलीसांनी आज सकाळी ७ वाजता कारवाई केली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर जमा करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोहेकॉ उमेश पवार आणि संतोष पाटील हे रात्रीची गस्त करत असतांना आज सकाळी राष्ट्रीय महामार्गावरील मानराज पार्क जवळ एक ट्रॅक्टर (क्रमांक एमएच १९ पी २८५० आणि ट्रॅली क्रमांक एमएच १९ एएन ८७०२) वाळूची वाहतूक करतांना दिसून आले.
पोलीसांनी ट्रॅक्टर थांबवून ट्रक्टर चालक सागर उल्हास कोळी (रा. वाल्मिक नगर) याच्याकडे वाळू वाहतूकीचा परवाना मागितला. वाळू वाहतूकीचा परवाना नसल्याने पोलीसांनी वाळूने भरलेले ट्रक्टर रामानंद नगर पोलीस ठाण्यात जमा केले. ट्रॅक्टर मालक जगदीश सोनवणे यांच्या ट्रॅक्टर मालकीचे असल्याचे समोर आले आहे. पोहेकॉ उमेश पवार यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात चालक सागर कोळी व मालक जगदीश सोनवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास रामानंदनगर पोलीस कर्मचारी करीत आहे.