मेष : आर्थिक उत्कर्षाच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल. रागावर नियंत्रण ठेवावं. महत्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाचा लाभ होईल. गृहसुशोभिकरणासाठी शोभेच्या वस्तूंची खरेदी कराल.
वृषभ : आपले आरोग्य उत्तम राहिल. आजचा दिवस प्रवासास अनुकूल. मित्रपरिवाराचे सहकार्य लाभेल. व्यावसायाची बीजं पेरली जातील. नोकरीत आपल्या अधिकार कक्षेत वाढ होईल.
मिथुन : महत्वाचे पत्रव्यवहार पूर्ण होतील. कामानिमित्त छोटे प्रवास करावे लागतील. व्यवसायात नवीन प्रोजेक्ट घेताना विचारपूर्वक निर्णय घ्या. व्यवसायीक उद्योगातील कामानिमित्त कर्जप्रकरण रखडले असेल तर ते मार्गी लागेल. प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील.
कर्क : कामात मित्रपरिवाचे सहकार्य लाभेल. गाण्याच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. आपल्याला प्रसन्नता लाभेल. दैनंदिन कामात दगदग झाली तरी फळ उत्तम मिळेल. आपले काम दुसऱ्यावर सोपवू नका.
सिंह : संतती बद्दल सुवार्ता कानी येईल. मनोबल उंचावणाऱ्या घटना घडतील. विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात यश मिळेल. नवीन व्यावसायिक करार घडतील. प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल.
कन्या : नोकरीतील चांगल्या कामाबद्दल वरिष्ठ प्रशंसा करतील. काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील. आर्थिक गुंतवणूकीसाठी आजचा दिवस अनुकूल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांची ओळखीतून कामे मार्गी लागतील. व्यावसायिक प्रदर्शने भरविता येतील.
तूळ : आज आपल्याला अचानक धनलाभाची शक्यता. आजचा दिवस भावंडसौख्यास अनुकूल. मनोरंजनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. करमणुकीच्या कार्यक्रमात सक्रीय सहभाग घ्याल. हौसेमौजेखातर खर्च केला जाईल. मानसिक स्वास्थ लाभेल.
वृश्चिक : भागिदारीत व्यवसायात कार्यक्षेत्र वाढण्यास अनुकूल दिवस. आपले निर्णय योग्य ठरतील. वैवाहिक सौख्य लाभेल. घरातील व्यक्तींच्या मतांना दुजोरा दिलात तर फायदा होईल. मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल.
धनु : तब्येतीच्या तक्रारी राहतील. संतसज्जनांचा सहवास लाभेल. नोकरीत कामाची दगदग जाणवेल. आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटना घडतील. एखादी गोष्ट आपण निश्चित करु शकू हा विश्वास वाटेल.
मकर : संततीच्या विवाहासंबंधी बोलणी चालू असतील त्यात यश मिळेल. आजचा दिवस आपली इच्छापूर्ती होण्यास अनुकूल. गुंतवणूकीसाठी अनुकूल योजना समोर येतील. कुटुंबात सुसंवाद साधलात तरच आपला निभाव लागेल. आकर्षक खरेदी कराल.
कुंभ : नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. नोकरीतील महत्वांची कामं सुरळीतपणे पार पडतील. मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. जाणीवपूर्वक आपल्या विचारात बदल करण्याचा प्रयत्न करावा. जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा.
मीन : आपलं मनोबल वाढणाऱ्या घटना घडतील. आपण घेतलेले निर्णय योग्य ठरतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीकारक घटना घडण्यास अनुकूल दिवस. नव्या उमेदीने कामाचा ध्यास घ्याल. कामानिमित्त परदेश प्रवास घडून येतील.