मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना ईडीने नोटीस पाठविल्याचे याबाबतचे वृत्त समोर आले आहे. ईडी’ने 30 तारखेला एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी पाचारण केले आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाचा त्याग करून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. प्रवेश करतांना त्यांनी ईडी आणि सीडी असे वाक्य जोडून खळबळ उडवून दिली होती.
यानंतर आता एकनाथराव खडसे यांना ईडीची नोटीस मिळाली असून त्यांना ३० डिसेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे वृत्त समोर आले आहे.