Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

अश्लील कृत्याची फाईल मिळवण्यासाठी बेकायदेशीररित्या झाडाझडती – प्रफुल्ल लोढा

by Divya Jalgaon Team
December 25, 2020
in जळगाव, राजकीय
0
अश्लील कृत्याची फाईल मिळवण्यासाठी बेकायदेशीररित्या झाडाझडती - प्रफुल्ल लोढा

जळगाव – राष्ट्रवादीचे प्रफुल्ल लोढा यांनी आज पत्रकार परिषद घेत काही खळबळजनक आरोप केले. यावेळी ते म्हणाले की, बीएचआर घोटाळ्याशी काहीही संबंध नसतांना माझ्यासह एका मित्राकडे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ‘त्या’ अश्लील कृत्याची फाईल मिळवण्यासाठी बेकायदेशीररित्या झाडाझडती घेतली. धक्कादायक बाब म्हणजे याप्रकरणी त्यांनी थेट स्व:पक्षाचे नेते एकनाथराव खडसे यांच्यावर देखील गंभीर आरोप केले.

याप्रसंगी ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून पक्षात नवचैतन्य निर्माण करण्याचे काम केले. परंतु एकनाथराव खडसे यांच्या जोडीला असलेला पारस लालवाणी यांने मला धमकावून माझ्यावर इन्कम टॅक्सची रेड करेल व माझ्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या स्त्रीचे फोटो व्हायरल करेल, अशी धमकी दिली. ‘त्या’ अश्लील कृत्याची फाईल मिळवण्यासाठी पोलिसांकडून बेकायदेशीर घर झडती घेत झालेल्या अन्यायाची दाद मी आता न्यायालयात मागणार आहे.

बीएचआर पतसंस्थेतच्या घोटाळ्याशी माझा मित्र सुनील कोचर (रा. सिल्लोड) व माझ्या चुलत भावाची पत्नी मनीषा अजय लोढा (रा.मुंबई) यांचा कोणताही संबंध नसताना खडसे व ललवाणी यांनी माझ्याकडे असलेली गिरीश महाजन व रामेश्वर नाईक यांच्या गैर कृत्याची फाईल शोधण्यासाठी माझ्याकडे व माझा चुलत भाव लोढा यांच्याकडे बीएचआर पतसंस्थेच्या नावाखाली घर झडती घेण्यात आली.

तसेच गिरीश महाजन व रामेश्वर नाईकच्या गैरकृत्याची फाईल प्रफुल्ल लोढाने तुमच्याकडे ठेवली आहे. त्या फाईल द्या, म्हणून कायद्याचे कोणतेही बंधन न पाळता न्यायालयाची संपूर्ण दिशाभूल करून सुनील कोचर व मुंबईचे लोढा भवन येथे २७ नोव्हेंबर रोजी सर्च वॉरंट काढून झाडाझडती घेतली. तर १ डिसेंबरला कुठलेही सर्च वॉरंट नसताना घर झडती घेण्यासाठी आलेले आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी लोकांना धमकावत होते व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत होते. कोर्टाची परवानगी नसताना सहा ते आठ तास कोचर यांच्या घरात आर्थिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी व पारस ललवाणीने गोंधळ घातला.

दरम्यान, मोबाईलमधील संभाषण अधिकाऱ्यांनी उडविले. एकनाथराव खडसे मला सांगत होते की, मी बघितलेले गिरीश महाजन व रामेश्वर नाईक यांची फाईल मला दे. मी त्यांना म्हटले राजकारणातील विकृती संपवण्यासाठी मी पुरावे गोळा केले आहेत. परंतु त्याचा फायदा मी राजकारणासाठी निरपराध लोकांचा बदनामी होऊ देणार नाही.

या संदर्भात संपूर्ण चौकशी व्हावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रपती, राज्यपाल यांच्याकडे खोट्या झाडाझडतीच्या कारवाईबद्दल दाद मागणार असल्याचे देखील लोढा यांनी सांगितले.

Share post
Tags: JalgaonMarathi NewsPoliticalअश्लील कृत्याची फाईल मिळवण्यासाठी बेकायदेशीररित्या झाडाझडती - लोढा
Previous Post

कबचौ उमविच्या कुलगुरूंकडे विद्यार्थी संघटनेने उपस्थित केले प्रश्न

Next Post

Breaking : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना ईडीची नोटीस

Next Post
Breaking : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना ईडीची नोटीस

Breaking : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना ईडीची नोटीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group