जळगाव – सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आपल्या विद्यापीठाअंतर्गत महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सुरु आहेत. राज्यात सर्व विद्यापीठांप्रमाणेच कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठतर्फे यशस्वीरित्या ऑनलाईन परीक्षा सुरु आहे.
मात्र या परीक्षा सुरु असताना विद्यार्थ्यांना असंख्य प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी विद्यापीठ प्रशासन सक्षम आहे असे वाटत नाही. म्हणून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे, विद्यापीठाच्या या नियोजनशून्य कारभाराचा व ढिसाळपणाचा सोमवारी विद्यापीठात जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष रोहन सोनवणे, जिल्हा सरचिटणीस सुरज नारखेडे, श्रीनाथ पाटील, सुनील शिंपी,गौरव वाणी, विशाल पाटील, जिवन सोनवणे, भूषण पवार ,सागर पाटील, योगेश पाटील, आदित्य गायकवाड, उपस्थित होते. यापुढेही परीक्षा अश्याच पध्दतीने सुरू राहिल्यास आम्ही विद्यापीठासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
अजून वाचा
चौकांच्या सुशोभिकरणाला सुरुवात करा – खा. उन्मेश पाटील