चाळीसगाव – सुमारे तीन कोटी रुपयांचा निधीतून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक सिग्नल चौक, धुळे मालेगाव कॉलेज वाय पॉईंट, खरजई नाका, पोलीस स्टेशन समोरील सावरकर चौक ,स्टेशन रोड चौकी परिसर ,अंधशाळा चौक, अभ्यासिका व अत्याधुनिक व्यायामशाळा अशा विविध कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. चौकांच्या सुशोभिकरणाला सुरुवात करा – खा. उन्मेश पाटील या तीन कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील चौकाचौकांचे सुशोभीकरण करून शहराच्या सौंदर्यात भर घातली जाणार आहे. तातडीने शहराच्या लौकिकात भर घालणाऱ्या चौकांचे सुशोभिकरणाच्या कामांना सुरुवात करा असे आदेशवजा सूचना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी कॉलेज चौकातील वाय पॉईंट पाहणी प्रसंगी दिल्यात.
चाळीसगाव शहरातून मालेगाव धुळे कडे जाणाऱ्या कॉलेज वाय पॉईंट या चौकाच्या सुशोभीकरण कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात यावी. यासाठी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी प्रत्यक्ष वाय पॉइंट येथे पाहणी केली.
यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी सुशोभिकरण कामासाठी प्रत्यक्ष वाय पॉइंट येथे पाहणी करीत प्रशासनाला तातडीने काम करण्याच्या सूचना दिल्यात. याप्रसंगी नगराध्यक्षा आशालता चव्हाण, महामार्ग प्रकल्प संचालक अे.आर. काळे व पालिका मुख्याधिकारी शंकरराव गोरे, पालिका गटनेते नगरसेवक संजूआबा पाटील भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक घृष्णेश्वर पाटील,नगरसेविका विजया प्रकाश पवार, नगरसेवक नितीन पाटील, पंचायत समिती उपसभापती सुनील पाटील, रा. वी. संचालक विश्वास चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र काका जैन, नगरसेवक भास्कर पाटील, गणेश महाले, माजी सरपंच रवींद्र पाटील, वास्तू विशारद आशुतोष खैरनार, पवन कदम, साहेबराव राठोड, बंडू पगार, कैलास गावडे, पी एम फॉर मोदी संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश पाटील, चेतन बागड, प्रतीक पाटील आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
शहराला स्मार्ट सिटीची मिळणार ओळख
खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाची पालिकेत सत्ता स्थापन झाली आहे. चाळीसगाव नगरपालिकेच्या विकासासाठी कोट्यवधींच्या योजना व निधींची तरतूदींसाठी तत्कालीन आमदार उन्मेश दादा पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे कडे भक्कम पाठपुरावा करीत शहर विकासासाठी भरीव निधी मिळविला. प्रत्यक्षात ही कामे सुरू आहेत.
अजून वाचा
सुमित पाटील यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित