पुणे | मनसे आणि ॲमेझॉनचा वाद आणखीनच चिघळला आहे. अॅमेझॉनने थेट न्यायालयात धाव घेतली असून मनसेप्रमुख राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे आक्रमक झाली आहे.
मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन पुण्यातील कोंढाव्यातील अॅमेझॉनचं ऑफिस मनसेने फोडण्यात आलं आहे. पुण्यातील कोंढवा मनसे प्रभाग अध्यक्ष अमित जगताप यांच्या नेतृत्वात अॅमेझॉनच्या कार्यालयावर खळखट्याक आंदोलन केलं आहे.
अॅमेझॉनच्या वेबसाईटवर मराठील भाषेचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मनसेने केली आहे. मराठी भाषेचा पर्याय असेल तर मराठी लोकांना बेवसाइटवरून आवश्यक वस्तूंची योग्य निवड करणं सोप्प होईल. मात्र यावर अॅमेझॉनकडून अपेक्षित असं उत्तर आलं नाही.
दरम्यान, राज ठाकरेंना 5 जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मनसे अधिक आक्रमक झाल्यास अॅमेझॉनच्या कार्यालयांवर खळखट्याक आंदोलन मोठ्या प्रमाणात होऊ शकतात.