जळगाव प्रतिनिधी । जळगावातील गोलाणी मार्केट परिसरातून दुचाकी लंपास केल्याची घटना २४ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता घडली. शहर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकी चालक परवेज खान सरदार खान (वय-३० ) हे गणेश कॉलनी, जिल्हा पेठ यांचे गोलाणी मार्केटमधील दत्त मंदीराजवळ नारळाचे होलसेल दुकान आहे. दुकानाच्या कामाच्या निमित्ताने त्यांच्याकडे (एमएच १९ एव्ही ५२०२) क्रमांकाची दुचाकी आहे. नेहमीप्रमाणे परवेज हे सकाळी ७ वाजता दुचाकीने आले. दत्त मंदीराजवळील पार्कींगच्या ठिकाणी दुचाकी पार्किंग करून लावली. दुपारी ३ वाजता जेवणासाठी घरी जाण्यासाठी गेले असता दुचाकी मिळून आली नाही. सायंकाळपर्यंत दुचाकीचा शोध घेतला मिळून न आल्याने शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
परवेज यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गणेश पाटील करीत आहे.