Thursday, April 2, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावातील के सी पार्क परिसरातील लूट प्रकरणी संशयिताला अटक

by Divya Jalgaon Team
December 25, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
बेकायदेशीर गावठी बनावटीची दारू तयार करणारी महिला अटकेत

जळगाव प्रतिनिधी । जळगावातील के सी पार्क परिसरातील तरुणाला मारहाण करून लूट प्रकरणी संशयिताला २४ डिसेंबर रोजी रात्रीच्या वेळी अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपी भाग्यवंत उर्फ भैय्या धीरज पाटील, २३, रा. इंद्रप्रस्थ नगर असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

शहरातील के सी पार्क येथील पवन बबन आढाळे हा २२ सप्टेंबर २०२० रोजी रात्री ९.३० वाजता मेडीकलवरून गोळ्या घेवून घरी परतत असतांना सुरेशदादा जैन यांच्या बंगल्यासमोर भुषण भरत सोनवणे उर्फ अठ्ठा व संदीप मधुकर सोनवणे उर्फ डॉन तसेच भाग्यवंत उर्फ भैय्या या तिघांनी अडविले होते. तसेच दुचाकीला लाथ मारुन पंकज आढाळे याला लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी पट्टीने बेदम मारहाण केली होती. यात पवन गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी शहर पोलीसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यात पोलिसांनी भुषण सोनवणे तसेच संदीप सोनवणे या दोघांना अटक केली होती. यानंतर दोघांची जामीनावर सुटका झाली होती. गुन्हा घडल्यापासून भाग्यवंत उर्फ भैय्या हा फरार होता. त्याच्याबाबत शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे पो.कॉ. तेजस मराठे, बशीर तडवी यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सहाय्यक फौजदार वासुदेव सोनवणे, हेडकॉन्स्टेबल विजय निकुंभ, रतन गीते, योगेश इंधाटे यांच्या पथकासह भाग्यवंत यास अटक केली.

Share post
Tags: crimeJalgaonMarathi Newsजळगावातील के सी पार्क परिसरातील लूट प्रकरणी संशयिताला अटक
Previous Post

पुण्यात मनसे आक्रमक; महाराष्ट्रातील पहिलं ॲमेझॉन फुटलं

Next Post

जि प तर्फे १८ गाळे धारकांना थकित भाडे भरण्यासाठी नोटीस

Next Post
जि प तर्फे १८ गाळे धारकांना थकित भाडे भरण्यासाठी नोटीस

जि प तर्फे १८ गाळे धारकांना थकित भाडे भरण्यासाठी नोटीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group