Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावातील काव्यरत्नावली चौकात झाडाला दिली जोरदार धडक

by Divya Jalgaon Team
December 25, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील काव्यरत्नावली चौकात झाडाला दिली जोरदार धडक

जळगाव – आज पहाटे काव्यरत्नावली चौकात एमएच १९ सीझेड : १५३२ या क्रमांकाच्या  कारने झाडाला धडक दिली.  सुदैवाने वेळीच कारमधील एअरबॅग उघडल्याने कारमधील तरुणांना दुखापत झालेली नाही.

शहरातील नंदनवन कॉलनी येथे आर.बी. हिंगणेकर हे वास्तव्यास आहेत. त्यांच्या मुलाचे काव्यरत्नावली चौकात एचडीएफसी बँकेच्या बाजुला फोटोग्राफीचा व्यवसायाचे ऑफिस आहे. गुरुवारी २४ डिसेंबर रोजी ऑफिसमध्ये रात्री उशीरापर्यंत काम सुरू होते. यावेळी  हिंगणेकर यांचा मुलगा रक्षण हा शिकण्यासाठी घरुन त्यांची (क्रमांक एम.एच. १९ सी.झेड १५३२) ही कार घेऊन आला होता. शुक्रवारी पहाटे उठल्यानंतर रक्षण हा त्याच्या सोबतच्या मित्रांसोबत तो काव्यरत्नावली चौक रस्त्यावर कार शिकत होता. कार शिकत असतांना  एचडीएफसी बँकेसमोर रक्षणचा पाय अचानक ब्रेक करून रेसवर गेला. व कारवरील नियंत्रण सुटून भरधाव कार ही काव्यरत्नावली चौकातील एचडीएफसी बँकेलगत असलेल्या वृक्षावर जाऊन धडकली.

याप्रसंगी  धडक देताच कारमधील एअरबॅग उघडली त्यामुळेच कारमधील रक्षण सह त्याचे दोघे मित्र यांना कुठलीही दुखापत झाली नाही. धडक इतकी जोरदार होती की ज्या झाडाला धडक दिली होती त्या झाडाची काहीवेळाने कारवर भली मोठी फांदी तुटून पडली. अपघाताच्या मोठ्याने झालेल्या आवाजाने सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या सर्व नागरिकांनी घटनास्थळावर गर्दी केली होती.

आज सकाळी महापालिकेचे कर्मचारी यांनी रस्त्यावर झालेल्या अपघातात झाड तुटल्याने रहदारी खोळंबली होती.  क्रेनच्या मदतीने वाहतूक सुरळीत करून अपघातातील वाहन पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे. तर शेवटचे वृत्त आले तोपर्यंत याबाबत पोलीस स्थानकात नोंद करण्याचे काम सुरू होते.

Share post
Tags: #Car AccidentcrimeJalgaonMarathi Newsजळगावातील काव्यरत्नावली चौकात झाडाला दिली जोरदार धडक
Previous Post

यावल ग्रामपंचायत निवडणुकीत आज एक ही अर्ज दाखल नाही

Next Post

यावल येथे रिपाइं आठवले गटातर्फे विविध समस्यांना घेवुन आंदोलन

Next Post
यावल येथे रिपाइं आठवले गटातर्फे विविध समस्यांना घेवुन आंदोलन

यावल येथे रिपाइं आठवले गटातर्फे विविध समस्यांना घेवुन आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group