यावल (रविंद्र आढाळे) – येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आवठवले गट) यांच्या वतीने तहसील कार्यालयावर विविध नागरी समस्यांना घेवुन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष राजु सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काडुन आंदोलन करण्यात आली .
दरम्यान आज दिनांक 24/12/2020 रोजी रिपाई पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजु सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली यावल तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला व तहसीलदार महेश पवार यांना विविध मागण्याचे लिखित निवेदन देण्यात आले या निवेदनात मागील अनेक दिवसापासुन वारंवार तहसील कार्यालयात येवुन सुद्धा खऱ्या गोरगरीब गरजू महिलांना धान्य मिळत नाही.
तसेच तालुक्यातील शेकडो निराधार व विधवा महिलांचे पगार वेळेवर मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीचे वेळ आली आहे. यावल नगर परिषदच्या माध्यमातुन मंजुर करण्यात आलेल्या घरकुलच्या लाभार्थ्यांना आजपर्यंतचा एकच हप्ता मिळला असुन नंतर लाभार्थ्यांना अनुदान मिळाले नसल्याने घरकुलचे लाभार्थी अनेक आर्थिक अडचणी सापडले आहे . अनेक वृद्ध महीलांचे निराधाराचे प्रकरणे तात्काळ मंजुर करून पेन्शन लागु करावी.
अनेक गोरगरीब नागरीकांकडे रेशन कार्ड आहे पण त्यांना धान्य मिळत नाही..असे अनेक प्रश्न घेऊन आज यावल तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला..मोर्चाचे नेतृत्व रिपाई चे जिल्हा अध्यक्ष राजू सुर्यवंशी यांनी केले..मोर्चात सहभागी आर पी आय जिल्हा अध्यक्ष अं सं विभाग इश्वर इंगळे. रिपाईचे शहर अध्यक्ष विष्णू पारधे.राजू तडवी. किरण तायडे. राहुल इंगळे. शकिल खाटिक आणी गरजु महिला मोठ्या संख्येने यांनी उपस्थित राहुन् आंदोलनात सहभाग घेतला .