जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या २९ व्या पदवीप्रदान समारंभात ज्या विद्यार्थ्यांना पदवी-पदवीका प्रमाणपत्र मिळवण्यासाठी १५ जानेवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावयाचे आहेत.
विद्यापीठातर्फे मार्च, एप्रिल, मे २०२० मध्ये व त्यापूर्वी घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर Home Page वरील Student Corner Examination Convocation वर उपलब्ध आहेत.
विनाविलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत १५ जानेवारी, २०२१ पर्यंत आहे. तर विलंब शुल्कासह ( विलंबशुल्क रू. १००/-) अर्ज भरण्याची मुदत १६ ते ३१ जानेवारी, २०२१ आहे. उत्तीर्ण वर्षापासून पाच वर्षाच्या पदवीप्रमाणपत्र शुल्क रूपये ३५०/- असून उत्तीर्ण वर्षापासून पाच वर्षा पेक्षा जास्त कालावधी झाला असल्यास रूपये १०००/- भरावे लागतील. पदवीप्रमाणपत्राचे शुल्क क्रेडिट कार्ड/डेबीट कार्ड/ नेट बँकिग द्वारे ऑनलाईल भरावे. ऑनलाईन अर्ज भरतांना फोटो आणि स्वाक्षरी jpeg formate मध्ये आणि गुणपत्रक pdf formate मध्ये स्कॅन करावे असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक बी.पी.पाटील यांनी केले आहे.