जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात ७१ रूग्ण बाधित आढळून आले आहेत. तर ३७ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजच्या अहवालानुसार ३ तालुके निरंक असल्याचे दिसून आले आहे.
भडगाव, मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील कोरोना निरंक आढळून आले आहे. तर जळगाव शहर- २३, जळगाव ग्रामीण-२, भुसावळ-११, अमळनेर-७, चोपडा-४, पाचोरा-१, धरणगाव-१, यावल-५, एरंडोल-१, जामनेर-२, रावेर-५, पारोळा-२, चाळीसगाव-७ असे एकुण ७१ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
आजच्या अहवालात ३ तालुके निरंक असल्याचे दिसून आले आहे. तर आज एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान जिल्ह्यात एकुण ५५ हजार ५६२ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५३ हजार ८२४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे तर ४१९ रूग्ण विविध कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.