जळगाव- अविनाश आचार्य विद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग पार पडला.
बुधवारी अविनाश आचार्य विद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. यावेळी अभाविप महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री सिद्धेश्वर लटपटे, जिल्हा संयोजक रितेश चौधरी आणि आदेश पाटील यांची उपस्थिती होती.
पहिल्या सत्रात अभाविप महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री सिद्धेश्वर लटपटे यांनी अभाविप परिचय मांडणी केली. तर दुसर्या सत्रात ग्रेट भेट प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी आजचा विद्यार्थी कसा असावा व आपल्या कार्याबद्दल ध्येयनिष्ठ असावा विविध विषयांवर विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. तिसर्या सत्रात विविध क्षेत्रात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांचे गट करून गटश: चर्चासत्र झाले.
दुपार सत्रात टीम बिल्डींग या विषयावर प्रा. डॉ. विवेक काटदरे यांनी विद्यार्थ्यांना संघटनात्मक काम करताना कशा पद्धतीने व कोणत्या उद्देशाने कार्य करावे? या विषयावर मार्गदर्शन केले. शेवटी अभाविप जळगाव महानगर विद्यार्थी विस्तारक ज्ञानेश्वर उद्येवाल यांनी अभाविपच्या कार्याबद्दल व आगामी दिशा विशद केली.