शेंदूर्णी- स्वर्गीय स्वप्नीलकुमार ललवाणी यांचे हृदयविकाराने मुंबई येथे ऑक्टोबर महिन्यात दुःखद निधन झाले. त्यामुळे खूप मोठा दुःखाचा डोंगर प्राध्यापक डॉ . दिलीपकुमार मदनलाल ललवाणी कुटुंबावर कोसळला. या दुःखातून सावरत आपल्या स्वर्गीय मुलाचे आठवण म्हणून आणि त्याला खरी श्रद्धांजली म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सहकार्य होईल या भावनेने प्रा. दिलीप ललवाणी यांनी रुपये पन्नास हजारचा धनादेश आणि रुपये पंधरा हजाराची पुस्तके आणि संदर्भ ग्रंथ शेंदूर्णी महाविद्यालयाकडे समर्पित केली.
अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शेंदुर्णीचे माजी विद्यार्थी व पि.के. कोटेचां महिला महाविद्यालय भुसावळ येथील निवृत्त प्राध्यापक आहेत . समर्पित ५० हजार रुपये रकमेची ठेव बँकेत ठेवून त्यातून आलेल्या व्याजाच्या रकमेतून दरवर्षी स्वर्गीय स्वप्निल तसेच महाविद्यालयातील माजी प्राध्यापक यांच्या नावाने महाविद्यालयातून प्रथम येणारे विद्यार्थी , ग्रंथालयात नियमित असणारा विद्यार्थी , उत्कृष्ट शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी , राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट स्वयंसेवक असे एकूण १० पारितोषिके देण्यात येणार आहेत.
धी शेंदूर्णी सेकंडरी एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष संजयजी गरुड , सचिव सतीश काशीद, महिला संचालिका उज्वला काशीद , सहसचिव दीपक गरुड , संस्थेचे सर्व सदस्यांनी कै . स्वप्निल ललवाणी यांना ठरावाद्वारे श्रद्धांजली वाहिली.
प्रास्ताविकात विभाग प्रमुख , उपप्राचार्य प्रा डॉ. श्याम साळुखे यांनी ललवाणी परिवाराचे आभार मानले. प्राचार्य डॉ वासुदेव पाटील यांनी मनोगतात प्रा. दिलीप ललवाणी आणि कुटुंबा बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रा. योगिता चौधरी सूत्रसंचालन यांनी केले . माजी विद्यार्थी संघ आणि वाणिज्य विभाग यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.