जळगाव- दंगलीच्या गुन्ह्यात नाव असलेल्या आरोपी कडून पंधरा हजार रुपयांच्या लाच प्रकरणी एसीबीच्या सापळ्यात अडकलेले सहाय्यक पोलीस संदीप अशोक हजारे यांना जळगाव जिल्हा न्यायालयाने २५००० रुपयांच्या जातमुचलक्यावर अटी शर्थीसह जामीन मंजूर केला आहे.
सरकार पक्षातर्फे अँड मोहन देशपांडे यानी तर स.पो.नि.संदीप हजारे यांच्या वतीने अँड कुणाल पवार व अँड मोहन पाटील यानी न्यायालयीन कामकाज पाहिले.