जळगाव : जळगाव येथील मानसी शर्मा ही ‘इंटरनॅशनल आयकॉनिक फ्रेश फ्रेस आॕफ इंडिया 2020’ विजेती ठरली आहे. माॅडेलींग क्षेत्रात कार्यरत असलेली मानसी शर्मा मुंबई येथील हाॅटेल पेनिनसुला ग्रॅन्ड येथील भव्य ‘इंटरनॅशल आयकाॅनिक फ्रेश फेस ऑफ इंडिया २०२०’ सिजन सिक्स मध्ये मान्यवरांच्या उपस्थितित सम्मानित करण्यात आले.
मानसी शर्मा ही सेंट जोसेफ, सेंट टेरेसाची विद्यार्थीनी असुन जैन इरिगेशन सिस्टीम लि. येथील सहकारी राजेश शर्मा यांची मुलगी आहे, तिने माॅडेलींग क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला असून मानसी मॉडेलींग क्षेत्रात यशस्वी होत असल्याचा आनंद असल्याचे पालक राजेश शर्मा म्हणाले.