जळगाव- बळीराम पेठ भागातील गणेश प्लाझा येथील दुकानाचे शटर उचकावून ड्राव्हरमध्ये ठेवलेले ४ हजार रूपयांची रोकड लांबविल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ठाकूरदास धरमदास कावना (वय-६२ रा. गौरी शंकर अपार्टमेंट गणेश नगर) यांचे बळीराम पेठेतील यश प्लाझा येथे सागर कार्पेट नावाचे दुकान आहे. सकाळी १०.३० ते रात्री ८.३० वाजेदरम्यान दुकान सुरू असते. १५ डिसेंबर २०२० रोजी रात्री ८.३० वाजता ते दुकान बंद करून गेले. दुसऱ्या दिवशी १६ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता दुकानावर आले असता त्यांना दुकानाचे शटर अज्ञात चोरट्यांनी शटर उचकविल्याचे दिसून आले.
दुकान उघडून आज जावून पाहणी केली असता त्यांना पैश्यांचा गल्ला तोडलेला दिसला. गल्ल्यातील ४ हजार रूपयांची रोकड लांबविल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ उमेश भांडारकर करीत आहे.