Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावात दुचाकी चोरून मोबाईल लंपास करणाऱ्या बच्चे गँगवर कारवाई

by Divya Jalgaon Team
December 23, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावात दुचाकींसह दोन चोरटे पोलिसांच्या ताब्यात

जळगाव- सध्या जळगाव शहरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढतांना दिसत आहे. याच पाश्र्वभूमीवर शनिपेठ पोलिसांनी बच्चे गँगवर कारवाई केली आहे. या गँगने  मोबाईल लांबविण्यासाठी दुचाकी चोरली आणि तिच्याच माध्यमातून मोबाईल  लंपास केला.

याप्रकरणी  तीन  अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांनी एकाच दिवशी विविध तीन ठिकाणांहून  लांबविलेले मोबाईलही पोलिसांनी हस्तगत केले आहे. तसेच  संबंधित तिघेही अल्पवयीन ही शनिपेठ हद्दीतील असून अल्पवयीन असल्याचा फायदा घेत चोर्‍या, हाणामारी करत असल्याने शनिपेठ पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

रफीक शेख मजीद मन्यार (वय ३१. रा. कोळीपेठ मन्यार वाडा ) यांचे रथ चौकात इलेक्ट्रॉनिकचे दुकान आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास रफीक शेख हे त्यांच्या एमएच १९ सीटी १८३४ ने सुभाष चौकातून रथ चौकाकडे जात असतांना तिघांनी रफीक शेखला मारहाण करण्यास सुरुवात केली.

तसेच  मारहाण करणाऱ्यापैकी  एकाने रफीक शेख यांना चाकूने पोटावर वार केला तर दुसऱ्याने त्यांच्याकडील दुचाकी जबरदस्तीने हिसकावून  त्याठिकाणाहून पळ काढला. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल आहे. याठिकाणाहून लंपास केलेले  मोबाईल आणि  दुचाकी हातात लागल्यावर तिघांनी शहरात विविध ठिकाणी मोबाईल  लांबविले.

यात दुचाकी चोरली यानंतर शहरातील बेंडाळे चौकात नागोरी चहाजवळून रिक्षा बसून मोहसीन खालीद बागवान (वय-१७ रा. जोशी पेठ पतंग गल्ली)  हे जात असतांना, त्यांच्या हातातून मोबाईल लांबविला होता. यानंतर रविंद्र सिताराम तायडे (वय-५० रा. हरेश्वर नगर ) हे सोमवारी २१ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडले असता रिंगरोडवरील संवेदनशिल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल समोरून मोबाईलवर बोलत पायी जात असतांना त्यांच्या हातातील १५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढला. यानंतर आकाशवाणी चौकातून मोबाईल लांबविला होता.

सलग चोरीच्या घटनांबाबत पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांनी मार्गदर्शन तसेच सुचना केल्या होत्या. शनिपेठ हद्दीत माया गँगच्या नावाने असलेल्या अल्पवयीन चोरट्यांनी मोबाईल लांबविले असल्याची गोपनीय माहिती शनिपेठ पोलिसांना मिळाली.

त्यानुसार शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विठ्ठल ससे यांच्यासह पोलीस उपनिरिक्षक खेमराज परेदशी, सहाय्यक फौजदार सलीम पिंजारी, पोलीस हेडकॉन्स्टेबल रविंद्र पाटील, पोलीस नाईक अमोल विसपुते, मुकूंद गंगावणे, अनिल कांबळे, राहूल पाटील, राहूल घेटे, यांच्या पथकाने प्रारंभी अल्पवयीन चोरट्याचा साथीदारास चौकशीकामी ताब्यात घेतले.

त्याच्याच माध्यमातून आकाशवाणी चौकात व्हाईटरचा नशा करणार्‍या माया गँगच्या दोघा अल्पवयीन चोरट्यांना सापळा रचून पथकाने ताब्यात घेतले असून  त्यांच्याकडून चोरीची दुचाकी तसेच तीन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे.

Share post
Tags: crimeJalgaonMarathi Newsजळगावात दुचाकी चोरून मोबाईल लंपास करणाऱ्या बच्चे गँगवर कारवाई
Previous Post

सुभाष चौक अर्बन सहकारी पतपेढीतून बनावट कागदपत्रे दाखवून घेतले कर्ज

Next Post

बळीराम पेठ भागातील दुकानाचे शटर फोडून ४ हजाराची रोकड लंपास

Next Post
चोरट्यांनी एक नवे तर तब्बल चार ठिकाणी केली घरफोडी

बळीराम पेठ भागातील दुकानाचे शटर फोडून ४ हजाराची रोकड लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group