जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिम्मित भुसावळ तालुक्यातील शिंदी येथील शिवप्रतिष्ठान क्रिकेट टिमतर्फे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मोरया क्रिकेट क्लब विजयी झाले आहे.
भुसावळ तालुक्यातील शिंदी येथील बोदवड रोड ला क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन केले होते. जळगाव येथील मोरया क्रिकेट क्लब (MCC) विरोधात शिंदी संघ यांच्यात अंतिम सामना झाला. या सामन्यात मोरया क्रिकेट क्लब (MCC) ने अंतिम खेळीत प्रथम पारितोषिक मिळवत ११ हजार १०१ रुपयांचे बक्षीस आणि ट्रॉफी पटकावले.
शिंदीचे पोलीस पाटील अतुल पाटिल यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. या सामन्यात मोरया क्रिकेट क्लब (MCC) चे कर्णधार दिपक धोरे आणि उपकर्णधार विशाल बारी (रायडर ) होते. तसेच या टीममध्ये दिपक बारी, अजित बारी, मनीष धोरे, अनिल बिजबिरे, सागर मिस्त्री, आकाश सोनवणे, पवन बारी, रोहित नाफडे, मयूर कोळी, प्रवीण बोरसे, समीर तडवी, प्रवीण नेमाडे, इस्राईल आदी खेळाडूंनी आपला खेळ केला. अंत्यत्त चुरशीच्या सामन्यात मोरया क्रिकेट क्लब ने विजेतेपद मिळवल्याने त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे. स्पर्धेला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.


