जळगाव प्रतिनिधी । जळगावातील अजिंठा चौफुलीजवळून बलात्कार करणाऱ्याला संशयिताला अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपीविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्थानकात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच शहरातील अजिंठा चौफुलीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज सकाळी ६ वाजता बलात्काराच्या गुन्ह्यात फरार असलेल्या संशयित आरोपीला सापळा रचून अटक केली आहे.
कैलास तुकाराम धाडी राहणार जळगाव तालुका असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तालुक्यातील एका गावातील पिडीत महिला व तिची आई कैलास धाडी याच्या शेतात कामाला जात होते. शेतातील काम करत असतांना पिडीत महिलेस शेतातील पत्री शेडमध्ये आरोपी कैलास वेळोवेळी बोलावून तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला. याबाबत पिडीतेने एमआयडीसी पोलिस स्टेशनला भादवि ३७६ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी कैलास तुकाराम धाडी हा फरार होता. कैलास धाडी हा बसने जळगावला येत असल्याची गोपनीय माहीती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजली होती. त्यानुसार त्यांनी पोलिस उपनिरिक्षक रामकृष्ण पाटील, पोहेकॉ शरद भालेराव, नरेंद्र वारुळे यांच्या पथकाला अंजिठा चौफुलीवर तैनात केले होते. सकाळी ६ वाजता संबंधीत बस अजिंठा चौफुलीवर येताच त्याला ताब्यात घेण्यात आले. पुढील कारवाईसाठी त्याला एमआयडीसी पोलिसांच्य स्वाधीन करण्यात आले आहे.