जळगाव प्रतिनिधी । जळगावातील गणपती नगर परिसरात भरदिवसा घरफोडी कारण्यात आली. सोमवारी सायंकाळच्या सुमारास रामानंद नगर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच शहरातील गणपती नगरात राहणाऱ्या एका वयोवृध्दाचे बंद घर भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असा एकुण ५० हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केले.
वैभव स्टेट कॉलनी पायोनिअर क्लबसमोर कांतीलाल पृथ्वीराज वर्मा (वय-७१) हे वयोवृध्द असल्याने घरात एकटेच राहतात. शहरातील वेगळ्या भागात त्यांचा मुलगा राहतो. सकाळ आणि सांध्याकाळी ते जेवणासाठीचा डबा घेण्यासाठी ते मुलाच्या घरी जातात. दरम्यान नेहमीप्रमाणे २१ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ते जेवणाचा डबा घेण्यासाठी घराचा मुख्य दरवाजाच्या लोखंडी दरवाजाला कुलूप लावून गेले. १.२५ वाजेच्या सुमारास ते डबा घेवून परत असले असता त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा लोखंडी दरवाजात तोडलेला दिसून आला. त्यांनी घरात पाहणी केली असता अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागीने, चांदीचे वस्तू आणि रोकड असा एकुण ५० हजार रूपयांची मुद्देमाल लंपास केला.
कांतीलाल वर्मा यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून घटनेची माहिती दिली. वर्मा यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुशिल चौधरी करीत आहे.