जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठकीत श्रीकांत मोरे यांची महानगराध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली.
शासकीय अजिंठा विश्रामगृहात मुकुंद सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाच्या महानगराध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत मोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या निवडीबाबत प्रा. प्रितीलाल पवार, रमेश सोनवणे, संजय पाटील, चंदन बिऱ्हाडे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.