नवी मुंबईः मुंबई एपीएमसी घाऊक बाजारात गेल्या काही दिवसांपासून भाज्यांची आवक वाढल्याने दरात घसरण सुरूच आहे. भाजीपाला घाऊक बाजारात 15 दिवसांपासून सातत्याने आवक वाढलीय. 500 ते 700 गाड्याची आवक असून, ग्राहक नसल्याने भाज्यांच्या दरात घसरण सुरूच आहे. भाजीपाला मार्केटमध्ये आज एकूण 600 गाड्यांची आवक आहे.
परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीमुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई एपीएमसी घाऊक बाजारात भाज्यांच्या किमती वाचल्या होत्या, मात्र आता बाजारात भाज्यांचे कोसळले असून, 40 रुपये प्रतिकिलोने विकला जाणारा कोबी आज 5 रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. तर फ्लॉवर 8 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे.
200 रुपये विकला जाणाऱ्या वाटाणा 15 ते 20 रुपये किलोने विकला जातोय. मुंबई भाजीपाला मार्केटमध्ये ग्राहक कमी असल्याने मालाला उठाव नाही. त्यामुळे भाज्यांच्या दरात घसरण झालीय. सध्या बाजारात भेंडी 25 ते 30 रुपये, कोबी 4 रुपये, फ्लॉवर 8 रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. तर आज नेमका भाज्यांचा बाजारभाव काय आहे ते जाणून घेऊया. भाजीपाला मार्केटमध्ये आज एकूण 600 गाड्यांची आवक झाली असून, भाज्यांच्या दरात घसरण सुरूच आहे.
एपीएमसीमधील भाज्यांचे दर
वाटाणा-15 ते 20
दुधी-10 ते 14
बांगी-12 ते 15
भेंडी- 30 रुपये प्रतिकिलो
कोथिंबीर- 5 ते 8 रुपये जुडी
मिरची- 30 ते 35 रुपये प्रतिकिलो
कोबी- 4 रुपये प्रतिकिलो
फ्लॉवर 8 रुपये प्रतिकिलो
टोमॅटो- 12 ते 14 रुपये प्रतिकिलो
काकडी-10 ते 15
गाजर-20 रुपये
शिमला-25 रुपये
फरसबी-30 ते 40