यावल (रविंद्र आढाळे) – तालुक्यातील भालोद येथील प्रगतशील शेतकरी तसेच महाराष्ट्र शासनाचा कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार प्राप्त आणि भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते तथा यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक श्री.नारायण शशिकांत चौधरी यांची भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष व जळगावचे आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे व किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पोपटतात्या भोळे यांनी श्री . चौधरी यांना नियुक्ती पत्रे देवुन निवड केली आहे . त्यांच्या या निवडीबद्दल माजी पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे, खासदार रक्षाताई खडसे, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पोपट भोळे, भाजपा जिल्हा सरचिटणीस डॉ.विजय धांडे, रावेर पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश धनके, भाजप यावल तालुध्यक्ष उमेश रेवा फेगडे, खान्देश नारीशक्ती अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे, भाजपा तालुका सरचिटणीस विलास चौधरी, कृउबा चे उमेश पाटील, माजी जिल्ह्य परिषद सदस्य हर्षल गोवींदा पाटील , भाजपाचे यावल शहराध्यक्ष डॉ .निलेश गडे , कृउबाचे संचालक हिरालाल चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत करून अभिनंदन केले आहे