भुसावळ,प्रतिनिधी । शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून ह्या समस्या सोडणविण्यात याव्यात अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आ. संजय सावकारे व नगराध्यक्ष रमण भोळे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनात भुसावळ नागरपरिषदेवर मागील काही वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. मात्र, या काळात शहरातील समस्या सोडणविण्यात भाजप अपयशी ठरलं असल्याचा आरोप केला आहे. शहरातील पंचशिल नगरातील नागरिक अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. याबाबत नगरपरिषदेकडे वारंवार पाठपुरावा करून देखील समस्या सोडविण्यात आलेल्या नाहीत.
याबाबत निवेदनात शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था पाहता झाली असून ते दुरुस्त करण्यात यावेत. भुसावळ पालिकेकडे गेल्या दोन तीन वर्षांपासून घरकुलांसाठी अर्ज केलेल्या गरजुंना त्वरित घरकुल मिळावे, पंचशिल नगरातील सर्व शौचालयांचे पुन्हा बांधकाम करण्यात यावे, शनी मंदिर ते पंचशिल नगर यांना जोडणारा पूल दोन वर्षांपासून पालिकेने तोडला असून तो त्वरित करण्यात यावा.
शहरातील झोपडपट्टी भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, शहरात सिग्नल यंत्रणा बसविण्यात यावी आदी मागण्या करण्यात निवेदनाद्वारे आल्या आहेत. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा महासचिव दिनेश विखारे, अरुण तायडे, अरुण नरवाडे, शोभाबाई वाघ, पंकज बोदडे, विलास सुरवाडे, सुरेखा बोदडे आदींनी स्वाक्षरी केली आहे.
अजून वाचा
लोहमार्ग पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकाची बदली