भुसावळ, प्रतिनिधी- भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे व उपनिरीक्षक कैलास जाधव यांची औरंगाबाद लोहमार्गच्या नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. हजेरीच्या वादातून ही कारवाई करण्यात आल्याचे मानले जात आहे.
लोहमार्ग पोलिस ठाण्यातील हजेरीबाबतचे प्रकरण मध्ये चांगलेच गाजले होते. एका पोलिस कर्मचाऱ्याने पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांच्याविरूध्द तक्रार केली हाेती. या कर्मचाऱ्याची नागपूर येथे ड्युटी लावल्यानंतर त्याची गैरहजेरी लावल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे ड्युटी तपासणी अधिकारी उपनिरीक्षक कैलास जाधव यांच्याशी त्यांचा वाद झाला होता.
याप्रकरणी संबंधित पोलिस कर्मचाऱ्याने थेट पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली. त्यानंतर हा कर्मचारी बेपत्ता झाला असून याबाबत हरविल्याची नाेंद करण्यात आली आहे. यानंतर येथील लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे व उपनिरीक्षक कैलास जाधव यांची औरंगाबाद लोहमार्गच्या नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
लोहमार्ग विभागाचे पोलिस अधीक्षक वैभव कुलबर्मे यांनी याबाबतचे आदेश काढले आहे. तर भुसावळ जीआरपीचा पदभार पाेलिस निरीक्षक सूरज सरडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहेत.
अजून वाचा
जिल्हा कारागृहात फांद्याच्या नावाखाली तोडली झाडे