पाचोरा : तालुक्यातील आखतवाडे रस्त्यावर प्रवासी अॅपे रीक्षा उभी असताना भरधाव डंपर ने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात कासोदा येथील 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर अन्य दोघे महिला जखमी झाल्या. सोमवारी दुपारी तीन वाजता आखतवाडे रस्त्यावर हा अपघात झाला.
आखतवाडे रस्त्यावर प्रवासी अॅपे रीक्षा (एम.एच.41/ सी 4105) उभी असताना भरधाव डंपर (एम.एच.19 झेड.2109) ने जोरदार धडक दिल्यानंतर अॅपे रीक्षातील शरीफा बी. शेख जाबाज (55, कासोदा) या किरकोळ कापड विक्रेत्या महिलेचा मृत्यू झाला तर सहप्रवासी सोनाबाई प्रकाश गढरी व सुनीता रमेश परदेशी या दोघे गंभीर जखमी झाल्या.