Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

शासकीय कोट्यातील रिक्त जागा भरण्यासाठी विशेष फेरीचे आयोजन

by Divya Jalgaon Team
December 21, 2020
in जळगाव, प्रशासन
0

जळगाव – सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाकरिता प्राथमिक शिक्षण पदविका (D.EI.Ed.) प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील ऑनलाईन प्रवेशाच्या एकूण तीन फेऱ्या घेण्यात आल्या आहेत. अद्याप शासकीय कोट्यातील जागा रिक्त असल्याने त्या विशेष फेरीव्दारे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पध्दतीने प्रवेश देण्यात येईल. यासाठी विद्यार्थी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या www.maa.ac.in या संकेत स्थळावरुन ऑनलाईन अर्ज करु शकतात.

याबाबतची सविस्तर सूचना, प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयनिहाय रिक्त जागा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

प्रवेशाची शैक्षणिक पात्रता – इयत्ता 12 वी उत्तीर्ण (खुला संवर्ग 49.5% व खुला संवर्ग वगळून इतर संवर्ग 44.5% गुणांसह), प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्याचा कालावधी दि. 22 ते 26 डिसेंबर, 2020 असून पडताळणी अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रांची ऑनलाईन पडताळणी करणे व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेशपत्र प्राप्त करुन घेण्याची तारीख 22 ते 27 डिसेंबर, 2020 अशी आहे. प्रवेश अर्ज शुल्क (ऑनलाईन भरणे) खुला संवर्गासाठी दोनशे रुपये तर खुला संवर्ग वगळून इतर संवर्गासाठी शंभर रुपये इतके आहे.

यापूर्वी ज्यांनी अर्ज पूर्ण भरुन Approve करुन घेतला आहे परंतु प्रवेश घेतलेला नाही, असे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. ज्यांचा अर्ज अपूर्ण किंवा दुरुस्ती (Correction) मध्ये आहे. तसेच नव्याने प्रवेश अर्ज भरुन प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले, असे सर्व उमेदवार अर्ज भरु शकतात. अर्ज ऑनलाईन Approve केल्याशिवाय उमेदवाराचा प्रवेशप्रक्रियेत समावेश होणार नाही. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांने स्वत:च्या लॉगीनमधूनच प्रवेश घ्यावयाचा आहे. विद्यार्थ्याने अध्यापक विद्यालयाची स्वत: निवड करुन लगेचच प्रवेशपत्र स्वत:च्या ईमेल/लॉगीनमधून प्रिंट घ्यावयाची आहे. त्यानंतर अध्यापक विद्यालयात चार दिवसाच्या आत प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश घ्यावयाचा आहे.

प्रवेश प्रक्रियेच्या या विशेष फेरीनंतर (D.EI.Ed.) प्रवेशासाठी कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी. असे राज्यस्तरीय डी.एल.एङ प्रवेश निवड, निर्णय व संनियंत्रण समिती, पुणे तथा संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Share post
Tags: JalgaonJalgaon Latest NewsMarathi Newsशासकीय कोट्यातील रिक्त जागा भरण्यासाठी विशेष फेरीचे आयोजन
Previous Post

पाचोरा येथे भरधाव डंपरची अ‍ॅपे रिक्षाला जोरदार धडक

Next Post

मुंबईसह सर्व महापालिका क्षेत्रात उद्यापासून रात्रीची संचारबंदी

Next Post
पादचारी मार्ग, उड्डाणपूल, वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण जूनपर्यंत पूर्ण करा!

मुंबईसह सर्व महापालिका क्षेत्रात उद्यापासून रात्रीची संचारबंदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group