Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

देशात जानेवारीमध्ये दिली जाऊ शकते कोरोनाची लस – आरोग्यमंत्री हर्षवर्धन

by Divya Jalgaon Team
December 21, 2020
in राष्ट्रीय
0
देशात जानेवारीमध्ये दिली जाऊ शकते कोरोनाची लस - आरोग्यमंत्री हर्षवर्धन

नवी दिल्ली – भारतीयांची कोरोना लसीची प्रतिक्षा पुढच्या वर्षी संपुष्टात येऊ शकते. कोरोनावरील लस भारतीयांना जानेवारीपासून देण्याची शक्यता आहे. याबाबतचे संकेत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी दिली आहे. लसीची सुरक्षा आणि प्रभाव यावर सरकारचे प्राधान्य आहे, असे हर्षवर्धन म्हणाले. जगातील अनेक देशांमध्ये आपातकालीन वापरला परवानगी देण्यात आली असून लसीकरणाला सुरुवात देखील झाली आहे. त्यामुळे भारतात लसीकरणाला कधी सुरुवात होणार असा प्रश्न भारतीयांना पडला आहे. अशातच आता केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी लसीकरणाचे संकेत दिले आहेत.

जानेवारी २०२१ मध्ये देशात लोकांना कोरोनावरील प्रभावी लस दिली जाऊ शकते. लसीची सुरक्षा आणि परिणामकारकतेला आम्ही प्राधान्य देणार आहोत. याबाबत आम्हाला कोणतीही तडजोड करायची नाही. मला वैयक्तिकरित्या असे वाटते की, जानेवारी महिन्याच्या कोणत्याही आठवड्यात आपण भारतीय नागरिकांना पहिली कोरोना लस देण्याच्या स्थितीत येऊ शकतो, असे आरोग्यमंत्री म्हणाले. लस विकासित करण्यात भारतही आघाडीवर आहे, असेही हर्षवर्धन म्हणाले. देशातील शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ स्वदेशी लस विकसित करण्यासाठी काम करत आहेत. ३० कोटी नागरिकांना लस देण्याची क्षमता ६ ते ७ महिन्यांत प्राप्त केली जाईल. जीनोम सीक्वेन्सिंग आणि कोरोना विषाणूचे अयासोलेशन करून लस बनवली जात आहे, अशी माहिती हर्षवर्धन यांनी दिली.

Our first priority has been safety & effectiveness of vaccines. We don’t want to compromise on that. I personally feel, maybe in any week of January, we can be in a position to give first COVID vaccine shot to people of India: Union Health Minister Dr Harsh Vardhan to ANI pic.twitter.com/I6rNWc4tad

— ANI (@ANI) December 20, 2020

भारतात लसीकरणासाठी अनेक औषध कंपन्यांनी केंद्र सरकारकडे अर्ज दाखल केला आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) सध्या भारत बायोटेक, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) आणि फायजर या कंपन्यांनी केलेल्या विनंती अर्जांची तपासणी करत आहे. जेणेकरुन या कंपन्यांच्या कोरोनावरील लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देता येईल. गेल्या आठवड्यात असे सांगण्यात आले होते की, DGCI ने या कंपन्यांकडून लसीबाबतचा अधिक डेटा मागितला आहे, ते खरे असले तरी त्याचा लस मिळण्याच्या वेळेवर कोणताही परिणाम होणार नाही.

Share post
Tags: #Harshvardhan#Helth MinisterCorona VaccineJanuary StartNew DelhiStatementकोरोनाची लसदेशात जानेवारीमध्ये दिली जाऊ शकते कोरोनाची लस - आरोग्यमंत्री हर्षवर्धन
Previous Post

हेल्थ टिप्स: सकाळी सकाळी कोमट पाणी प्या, जाणून घ्या फायदे

Next Post

भारतात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये साडेचार कोटी फोनची खरेदी

Next Post
भारतात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये साडेचार कोटी फोनची खरेदी

भारतात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये साडेचार कोटी फोनची खरेदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group