कोरोना महामारीमुळे देशातील काही क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे, तर काही क्षेत्रांची उलाढाल चांगली रेकाॅर्डब्रेक होताना दिसत आहे. विशेषतŠ स्मार्टफोन, लॅपटॉप, वर्प फ्रॉम होम गॅझेट इंडस्ट्रीला चांगले दिवस आले आहेत. स्मार्टफोन खरेदी करण्यात तर हिंदुस्थानींनी रेकाॅर्ड केला आहे. सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये तर 4 कोटी 40 लाख फोनची खरेदी झाली आहे.
आयडीसी इंडियाच्या अहवालानुसार, 2020च्या तिसऱया तिमाहीत स्मार्टफोनची मागणी अपेक्षेपेक्षा जास्त नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे ऑक्टोबर 20 मध्ये हिंदुस्थानींनी दोन कोटी 10 लाख स्मार्टफोनची खरेदी केली. त्याआधी सप्टेंबर महिन्यात दोन कोटी 30 लाख स्मार्टफोनची विक्री झाली. कोरोना महामारीमुळे ऑनलाईन शिक्षण, वर्प फ्रॉ होम वाढले. त्यामुळे नवीन स्मार्टफोन घेण्याकडे ग्राहकांचा कल राहिला. ऑनलाईन शॉपिंग आणि ऑनलाईन शॉपिंग फेस्टिवलमध्ये घसघशीत सूट मिळाल्यानेही स्मार्टफोन खरेदी वाढली आहे.
महानगरांमध्ये खरेदीचा विक्रम
मुंबई, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई आणि कोलकाता या महानगरांमध्ये 25टक्के स्मार्टफोन खरेदी झाली आहे. त्याखालोखाल जयपूर, गुडगाव, चंदीगढ, लखनौ, भोपाळ आणि कोईम्बतूर या शहरांत स्मार्टफोन विक्री जास्त झालेय.


