मुंबई – करोनाच्या महासंकटानंतर अनेकजण बेरोजगार झाले आहेत. सर्वसामान्यांना आर्थिक अडचणींचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे.
त्यातच या महिन्यात घरगुती गॅसच्या किंमती 100 रूपयांनी वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.
मात्र, पेटीएम कंपनीने एक खास ऑफर सादर केली आहे. पेटीएमद्वारे बुकिंग केल्यास ग्राहकांना 500 रूपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळणार आहे. हा कॅशबॅक पहिल्यांदाच पेटीएमद्वारे गॅस सिलिंडर बुक करणाऱ्यांना दिला जाणार आहे.
हा कॅशबॅक मिळविण्यासाठी ग्राहकांना पेटीएमच्या प्रोमोकोड सेक्शनमध्ये जाऊन FIRSTLPG असा प्रोमोकोड लिहावा लागणार आहे.
यानंतर गॅस बुकिंग करताना 500 रूपयांपर्यंतचा कॅशबॅक ग्राहकांना मिळणार आहे.
मात्र, या प्रोमोकोडचा वापर एकदाच करता येणार आहे. ही ऑफर 31 डिसेंबर 2020 पर्यंतच असणार आहे.
PayTm वरून सिलिंडर कसा बुक करावा?
* पेटीएम अॅप ओपन करून त्यात Recharge and Pay Bills सेक्शनवर क्लिक करा. त्यात Book Cylinder हा पर्याय निवडा.
* त्यानंतर तुम्हाला तुमच्या गॅस कंपनीचे नाव निवडायचे आहे. उदा. Bharat Gas, HP Gas, Indane
* नंतर गॅस एजन्सीमध्ये दिलेला रजिस्टर मोबाईल नंबर किंवा एपीजी आयडी टाकाल. नंतर Proceed वर क्लिक करा.
* त्यानंत तुम्हाला तुमच्या मोबाईल स्क्रिनवर LPG ID, कंन्ज्युमर नाव आणि एजन्सीचे नाव दिसेल. त्याखालीच सिलिंडरसाठी द्यावी लागणारी रक्कम ही दाखवली जाईल.
* त्यानंतर Paytm Gas Booking Promocode चा Firstlpg हा प्रोमोकोड, संबंधित सेक्शनमध्ये टाका. याच कोडवर तुम्हाला 500 रूपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे.