जळगाव प्रतिनिधी । जळगावातील दुकानातून साड्या चोरणाऱ्या संशयित पोलीसांच्या जाळ्यात अडकला आहे. त्याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडे चोरी केलेल्या साड्या हस्तगत करण्यात आले.
शहरातील बळीरामपेठ परिसरात गांधी मार्केटसमोरील गुलशन कलेक्शन या कपड्याच्या दुकानात सुरेश पुंडलीक ठाकरे (३९, रा. कोळी पेठ) व किशोर जानकीराम बाविस्कर (वय- ३०, रा. वाल्किम नगर) जाावून जबरदस्तीने साड्या चोरुन नेल्याची घटना १७ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.
गुन्हा दाखल होताच शहर पोलिसांनी सुरेश ठाकरे याला अटक केली होती तर त्याचा साथीदार किशोर बाविस्कर हा फरार होता. शनिवारी सायंकाळी किशोर बाविस्कर याला त्याच्या घरुन अटक करण्यात आली. त्याने चोरी केलेल्या साड्या हस्तगत केल्या आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.