जळगाव : रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टने अमेरीकेतील रोटरी क्लब ऑफ तल्लाहस्सी यांच्या सहकार्याने डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटल येथे कायमस्वरुपी तयार केलेल्या
कार्यक्रमास प्रांतपाल शब्बीर शाकीर, गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खा.डॉ.उल्हास पाटील, रोटरी फाऊंडेशन झोन 6 चे सहक्षेत्रीय समन्वयक राजीव शर्मा, डी.जी.एन. डॉ. आनंद झुनझुनवाला, माजी प्रांतपाल राजेंद्र भामरे, गोदावरी फाऊंडेशनचे उपाध्यक्ष सुभाष पाटील, डॉ. केतकी पाटील, रोटरी वेस्टचे अध्यक्ष तुषार चित्ते, मानद सचिव केकल पटेल, प्रकल्प प्रमुख डॉ. सुशील राणे, सहप्रमुख डॉ.राजेश पाटील, संदीप काबरा, किरण राणे, अरुण नंदर्षी आदिंची प्रमुख उपस्थिती तर अध्यक्षस्थानी माजी प्रांतपाल किशोर केडीया यांची उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते फित कापून लोकार्पण करण्यात आलेल्या आयसीयुची पाहणी करुन माहिती देण्यात आली. माजी प्रांतपाल राजीव शर्मा, डॉ.उल्हास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. किशोर केडिया यांनी रोटरी वेस्टने मूळ जळगावकर असलेल्या अमेरिकेतील संतोष प्रधान यांच्या सहकार्याने तेथील रोटरी क्लबची मदत मिळवून रुग्णसेवेचा अत्यंत मोलाचा कायमस्वरुपी प्रकल्प साकार केला याबद्दल अध्यक्षीय भाषणात अभिनंदन केले. रोटरी वेस्ट आणि डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजने यापुढेही सेवा प्रकल्पात सोबत काम करण्याची मालिका सुरु ठेवावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविक अध्यक्ष तुषार चित्ते यांनी केले. प्रकल्प प्रमुख डॉ. सुशील राणे यांनी प्रकल्पाची माहिती दिली. सूत्रसंचालन सरिता खाचणे यांनी तर आभार बालरोग तज्ज्ञ डॉ.राजेश पाटील यांनी मानले. डॉ. केतकी पाटील यांना रोटरी वेस्टचे सदस्य पद प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमास डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पीटलचे उपप्राचार्य प्रा. एन.जी.चौधरी, डॉ. वैभव पाटील, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, प्रशासन अधिकारी आशिष भिरुड, रोटरी प्रेसिडेंट एनक्ल्यू संगीता पाटील, सहप्रांतपाल योगेश भोळे, रोटरी वेस्टचे माजी अध्यक्ष गनी मेमन, रमण जाजू, विनोद बियाणी, अनंत भोळे, चंद्रकांत सतरा, सुनील सुखवाणी, कुमार वाणी, संजय इंगळे, प्रविण जाधव, विवेक काबरा, शंतनू अग्रवाल, अनुप असावा, देवेश कोठारी, विजय शामदाणी, सचिन वर्मा, सुदाम वाणी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.