शेंदुर्णी – आज धी.शेंदुर्णी सेंक.एज्यु.को. ऑप.लि.शेंदुर्णी संचलित न्यू इंग्लिश स्कूल बेटावद बु. विद्यालयात कै.आचार्य बापूसाहेब गजाननराव गरूड यांची ३६वी आणि राष्ट्र संत गाडगेबाबा यांची ६४ वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे स्थानिक सल्लागार समिती चे अध्यक्ष आण्णासाहेब गुरूदास भाऊ कदम यांनी स्विकारले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.आर.एस.ब्राम्हणे यांनी केले. गावातील प्रथम नागरिक सरपंच रामदास कदम यांनी मार्गदर्शन पर भाषण केले. शिक्षक मनोगत विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक सुनिल पाटील यांनी व्यक्त केले. आठ दिवसांपासून घेण्यात आलेल्या वकृत्व स्पर्धा निंबध स्पर्धा चित्र कला स्पर्धा अशा विविध ऑनलाईन स्पर्धाचे निकाल जाहीर करण्यात आले व विजेत्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिके देण्यात आली.
सदर कार्यक्रमाला गावातील प्रमुख मंडळी उपस्थित होती आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनीं यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक ए.आर.तडवी यांनी मानले.तसेच सूत्रसंचालन आर.एस.कोळी यांनी केले.