जळगाव – भारतीय जनता पार्टी बाराबलुतेदार आघाडी, जळगाव जिल्हा परीट सेवा मंडळ, संत गाडगेबाबा युवा फाउंडेशन, संत श्री गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्था, परीट समाज शिक्षक मंडळ यांच्यावतीने आज दिनांक २० डिसेंबर रोजी गाडगे बाबा उद्यान येथे संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी निमित्त अभिवादन व अन्नदान करण्यात आले.
संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्याचे पूजन व माल्यार्पण आमदार सुरेश भोळे महापौर सौ. भारती सोनवणे, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, माजी नगराध्यक्ष वासू सोनवणे, माजी नगरसेवक चेतन शिरसाळे, नरेंद्र जाधव, दीपक बाविस्कर, सागर सपके, दिलीप शेवाळे, अरुण राऊत, अरुण सपकाळे, शंकरराव निंबाळकर, प्रभाकर खर्चे, विजय शेवाळे, गणेश बच्छाव, मुकुंद सपकाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
याप्रसंगी गरजूंना अन्नदानाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यशस्वितेसाठी सुरेश ठाकरे, भास्कर वाघ, दीपक राऊत, गणेश शेळके, प्रशांत मांडोळे, बापू सपके, ईश्वर मोरे, वसंत कापसे, जयंत सोनवणे, मनोज वाघ, संतोष वेणीकर, मनोज निंबाळकर, पवन शिरसाठ, किशोर बोरसे, सुभाष शिरसाळे, विशाल जाधव, विनोद शिरसाळे, दिनकर सोनवणे, रमेश सूर्यवंशी, सर्जेराव बर्डॉस्कर, संदीप महाले, अमोल रोकडे, अतिष शेवाळे, मयुर जाधव, गिरीश शिरसाळे, रोहित सोनवणे, पंकज शिरसाळे, मनोहर सपकाळे, उमाकांत जाधव तसेच विविध संस्थेचे पदाधिकारी मान्यवर व बहुसंख्येने समाज बांधव या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप संत गाडगेबाबा यांचे विचार व्यक्त करून व गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला भाजनाद्वारे करण्यात आला.