Friday, April 3, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मी भाजपा हा पक्ष सोडलेला नाही – माजी मंत्री एकनाथराव खडसे

राजीनामाही दिलेला नाही

by Divya Jalgaon Team
October 18, 2020
in जळगाव, राजकीय
0
या संस्थेच्या प्रॉपर्टी मातीमोल भावात घेतलेल्या नेत्यांचे रेकॉर्ड देईल- खडसे

जळगाव – मी भाजपा हा माझा पक्ष सोडलेला नाही तसेच राजीनामाही दिलेला नाही असं भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. एकनाथराव खडसे यांनी भाजपाचा राजीनामा दिल्याच्या चर्चा आणि वृत्त काही प्रसारमाध्यमांनी प्रसारित केलं होतं. मात्र एकनाथराव खडसे यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत मी भाजपा हा पक्ष सोडलेला नाही असं एकनाथराव खडसे यांनी म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून एकनाथराव खडसे हे नाराज आहेत. त्यांनी त्यांची नाराजी जाहीरपणे बोलूनही दाखवली होती. जळगावात गेल्या काही दिवसांपासून घटस्थापनेच्या दिवशी एकनाथराव खडसे भाजपा सोडणार अशाही चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान एकनाथराव खडसे यांनी मी पक्ष सोडलेला नाही, राजीनामा दिलेला नाही असं म्हटलं आहे.

नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १७ ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. मात्र त्यानंतर विजयादशमी किंवा त्याआधी एकनाथ खडसे भाजपाला राम राम करुन राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्याही चर्चा रंगल्या. आज काही वेळापूर्वी काही प्रसारमाध्यमांनी एकनाथ खडसे यांनी भाजपा सोडल्याच्या बातम्या चालवल्या. यानंतर एकनाथराव खडसे यांनी स्पष्टीकरण देत मी भाजपा सोडलेलं नाही आणि राजीनामा दिलेला नाही असं स्पष्टीकरण दिलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या वेळी एकनाथराव खडसे यांना तिकिट दिलं नव्हतं. त्यामुळे ते चांगलेच नाराज झाले होते. एवढंच नाही तर त्यांना जमीन वाद प्रकरणात कोणत्याही प्रकारची क्लिन चीट न दिल्याने त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली होती. गेल्या काही दिवसांपासून एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.

तीन दिवसांपूर्वीच छगन भुजबळ यांनीही एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादीत येणारच नाहीत असं नाही असं सूचक वक्तव्य केलं होतं. आज अचानक काही माध्यमांनी एकनाथराव खडसेंनी राजीनामा दिल्याच्या बातम्या चालवल्या. त्यानंतर एकनाथराव खडसे यांनी स्वतः समोर येत आपण राजीनामा दिलेला नाही पक्ष सोडलेला नाही असंही सांगितलं आहे.

अजून वाचा 

खडसेंच्या प्रवेशावर पहिल्यांदाच अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया

Share post
Tags: bjpEknathrao KhadseJalgaon newsNCP NewsPolitical NewsResine
Previous Post

सुमित पाटील यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

Next Post

Corona : राज्यभरात ११ हजार २०४ जण करोनामुक्त

Next Post
कोरोनाचा दिल्लीत कहर; लॉकडाऊन पुन्हा होणार का ?

Corona : राज्यभरात ११ हजार २०४ जण करोनामुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group