Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

खडसेंच्या प्रवेशावर पहिल्यांदाच अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया

by Divya Jalgaon Team
October 16, 2020
in राजकीय, राज्य
0
eknath khadse news

मुंबई – भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. एकनाथ खडसे जाहीरपणे आपल्यावर अन्याय झाला असून देवेंद्र फडणवीसांना जबाबदार ठरवत असून यामुळे ते पक्षातून बाहेर पडणार असल्याचं बोललं जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात अजित पवारांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

“राजकीय जीवनात अनेकांच्या भेटीगाठी होत असतात. त्यानुसार काही जण मला भेटून गेले. त्यामुळे भेट झाली म्हणजे काही काळंबेरं समजू नये. भाजपाचं सरकार असताना आम्हीदेखील लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांना भेटायचो. मी तर सगळ्यांना भेटत असतो, तुम्ही मला कित्येक वर्ष ओळखता,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. खडसेंबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, “एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबद्दल मला काही माहिती नाही. जेवढी माझ्याकडे माहिती होती ती मी तुम्हाला दिली आहे”.

अजित पवार यांनी यावेळी जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीवरुन होणाऱ्या आरोपांना उत्तर दिलं. ते म्हणाले की, “हे जाणुनबुजून करत नाही. कॅगच्या अहवाल दोन दिवसांच्या अधिवेशनात सादर करण्यात आला होता. कॅगच्या अहवालावर कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. तशा पद्धतीच्या सूचना गेल्या आहेत”.

अजित पवार म्हणाले की, “जोरदार पावसामुळे सोलापूर, पंढरपूर, सांगली यासह राज्यातील अनेक भागाला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. त्यामध्ये विशेषतः शेतकर्‍यांचे हाताला आलेले पीक वाया गेलं आहे. त्यामुळे अगोदरच करोना आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला असून त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर ज्या भागात नागरिक अडकले आहेत त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. ज्या भागांचं नुकसान झालं आहे. तेथील नागरिकांच्या पाठीशी राज्य सरकार आहे. काही महिन्यापुर्वी कोकण भागात झालेल्या नुकसान परिसराची पाहणी केंद्रीय पथकाने तात्काळ केली. त्यानुसार आता या भागाची देखील करावी आणि केंद्राकडून लवकरात लवकर मदत द्यावी,” अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली. हवामान विभागाने अंदाज वर्तवल्यापेक्षा अधिक पाऊस झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

Share post
Tags: Ajit PawarDevendra FadanvisEknathrao KhadseMumbaiNCPPolitical News
Previous Post

राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी; सुप्रीम कोर्ट म्हणतं…

Next Post

एटीएम कार्ड क्लोन करण्याचा गोरखधंदा सुरू

Next Post
breaking news

एटीएम कार्ड क्लोन करण्याचा गोरखधंदा सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group