जळगाव (प्रतिनिधी) । जिल्ह्यात आज दिवसभरात ३३ नवीन कोरोना बाधित आढळून आले असून ४६ बाधित रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर दिलासादायक असे कि आज एकही बाधित रुग्णांचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, जिल्ह्यातील १० तालुके निरंक असल्याचे दिसून आले आहे.
आजच्या अहवालानुसार जिल्ह्यात एकुण ५५ हजार २८६ बाधित रूग्ण आढळले आहे. यापैकी ५३ हजार ६१२ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे तर ३५७ रूग्ण विविध कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. आज जळगाव शहरातील एका बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूची संख्या 1317 इतकी आहे.
जळगाव शहर-५, जळगाव ग्रामीण-०२, भुसावळ-०३, अमळनेर-०१, चोपडा-0१, पाचोरा-00, भडगाव-00, धरणगाव-००, यावल-00, एरंडोल-00, जामनेर-05, रावेर-00, पारोळा-००, चाळीसगाव-११, मुक्ताईनगर-00, बोदवड ०० आणि इतर जिल्ह्यातील 00 असे एकुण ३३ रूग्ण बाधित आढळले आहे.


