Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

निंभोरा येथे गुन्ह्याच्या स्वरूपात दाखल होणे आश्‍चर्यकारक

आ. गिरीश महाजन यांचा आज जी.एम. फाऊंडेशनमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आरोप

by Divya Jalgaon Team
December 18, 2020
in जळगाव, राजकीय
0
कुणी पक्षातून गेल्याने काहीही परिणाम होणार नाही- महाजन

जळगाव प्रतिनिधी । तीन वर्षापूर्वीची घटना निंभोरा येथे गुन्ह्याच्या स्वरूपात दाखल होणे आश्‍चर्यकारक आहे. नूतन मराठातील वादाशी काडीचा संबंध नसतांना आपल्यावर अतिशय संशयास्पद पध्दतीने निंभोरा पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेला गुन्हा हा गंभीर प्रकार असून या मागे कुणी तरी ‘कलाकार’ असल्याचा आरोप माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी केला. आज जी.एम. फाऊंडेशनमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावत विरोधकांचे नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला.

गेल्या वर्षी आपण मंत्री असतांना अ‍ॅड. विजय भास्कर पाटील हे आपल्याला भेटले होते. अगदी आम्ही तीन-चार वेळेस एकत्र जेवण देखील केले आहे. यामुळे इतक्या स्वरूपाचा गंभीर गुन्हा नोंदविण्यात आली ही बाब सर्व संशयास्पद आहे. यामुळे हायकोर्टात अपील दाखल केले असून यात कोर्टाने तपास करून मगच गुन्हा दाखल करावा असे निर्देश दिले आहेत. ७ जानेवारीपर्यंत न्यायालयाने दिलासा दिला असल्याची माहिती आ. महाजन यांनी याप्रसंगी दिली.या प्रकरणात सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आ. गिरीश महाजन यांनी केली आहे.

यात अगदी मोबाईलच्या लोकेशनसह सर्व सखोल चौकशी व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आजवर जळगाव जिल्ह्यात अशा स्वरूपाच्या घटना घडल्या नाहीत. अशा प्रकारचे गलीच्छ राजकारण कधीही केले नाही. मात्र आता तीन वर्षानंतर गुन्हे दाखल करण्याची पध्दत चुकीची आहे. नूतन मराठा या संस्थेशी आमचे काहीही देणेघेणे नाही. मात्र यात आम्हाला अडकवण्यात आले असून यात पडद्यामागे कुणी तरी कलाकार असल्याचा संशय गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.

अ‍ॅड. विजय भास्कर पाटील हे मध्यंतरी जेलमध्ये होते. त्यांच्यावर कलम-३०७ सारखा गुन्हा दाखल करण्यात आलेला असल्याकडे त्यांनी लक्ष वेधून घेतले. या प्रकरणी आपण पूर्ण खोलवर जाणार असून यातील सूत्रधाराला शोधून काढणार असल्याचा इशारा देखील आ. गिरीश महाजन यांनी दिला. जिल्ह्यात सूडाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. सत्ता येते आणि जाते. आज आपली सत्ता असली तरी उद्या स्थिती बदलू शकते असा सूचक इशारा देखील त्यांनी दिला.  आमच्या कडे देखील बरेच काही असल्याचे आ. महाजन म्हणाले. मात्र आपण खोटे काहीही करणार नसून खरेच करणार असल्याची पुस्ती देखील त्यांनी जोडली. सुनील झंवर यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी संबंध असल्याची कबुली देखील त्यांनी दिली. दरम्यान, बीएचआरमध्ये आपले खाते नसून आपण कर्जदारही नाही. मात्र सुनील झंवर यांचा मित्र म्हणून करत असलेली बदनामी ही देखील चुकीची असल्याचा आरोप आ. गिरीश महाजन यांनी केला.

Share post
Tags: Girish MahajanJalgaonMarathi NewsPoliticalनिंभोरा येथे गुन्ह्याच्या स्वरूपात दाखल होणे आश्‍चर्यकारक
Previous Post

२ लाखाची लाच घेणाऱ्या तहसीलदार, मंडळाधिकारी व तलाठ्याला अटक

Next Post

जिल्ह्यात आज ३३ कोरोनाबाधित आढळले ; ४६ कोरोनामुक्त

Next Post
जिल्ह्यात आज २८८ रूग्ण कोरोनाबाधित आढळले

जिल्ह्यात आज ३३ कोरोनाबाधित आढळले ; ४६ कोरोनामुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group